कोरेगाव, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व त्यांच्या कुटुंबीयांवर केंद्र सरकारच्या केंद्रीय यंत्रणा मार्फत राजकीय सुड उगवण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला,
कोरेगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोरेगाव शहरात रास्तारोको केल्यानंतर कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. तहसीलदारांना निवेदन देऊन या झालेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे . तसेच पवार कुटुंबीय पवार कुटुंबीयांवर यापुढे अशा प्रकारच्या आकसापोटी ची कारवाई झाली तर मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, कोरेगाव तालुका अध्यक्ष भास्कर कदम , कोरेगाव विधानसभा अध्यक्ष अरुण माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, राजू काका भोसले ,प्रतिभाताई बर्गे ,संजय पिसाळ, नितिन ओसवाल ,राहुल साबळे, अमरसिंह बर्गे, अजित बर्गे,प्रताप बोधे ,संकेत बाबर गणेश धनावडे, नितीन लवगारे ,सागर जाधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.