जिहे- कटापुर योजनेच्या पाण्याचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पूजन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिहे- कटापुर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोचले. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी सात वाजता झाले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि खटाव व कोरेगाव तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या निलादेवी जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशालीताई फडतरे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस जिहे कठापूरच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. तसेच या पाण्याचा कलश भागातील प्रत्येक गावात दिले गेले असून, त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे.

आमदार महेश शिंदे म्हणाले, गेली दहा वर्षे जलसंपदा मंत्रीपद हे सातारा जिल्ह्याकडे होतेIn. या दहा वर्षात या योजनेचे कसलेही काम झाले नव्हते. तसेच या योजनेचे काम कधीच होऊ शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले होते.

पण, याला गती मिळाली ती जाखणगावला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही त्यांना नरेंद्र मोदींचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचा हा भाग आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय काहीही होणार नाही. या योजनेची सुप्रमा व जलआयोगाच्या मान्यता घेणे गरजचे आहे, असे सांगितले होते. मोदींनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता दिली. त्यानंतरच या योजनेला खर्च करण्याची मुभा मिळाली. २००४ ते २०१४ पर्यंत कोणताही निधी या योजनेसाठी खर्ची पडला नव्हता.

जून २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी आम्ही हा विषय मांडला होता. आता जिहे कठापूर योजनेला सोलार योजना जाहीर केलेली आहे. भविष्यात या योजनेसाठी ३८ मेगावॅटचा सोलार पावर प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. यातून अगदी माफक दरात या योजनेचे पाणी मिळणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!