जिल्हयासाठी मंजूर झालेल्या १०० बेडच्या नवीन रूग्णालयासाठी जुना दवाखान्याची जागा उपलब्ध करून द्यावी, शिवेद्रसिंहराजे यांची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्हयाला १00 बेडचे नवीन जिल्हा रूग्णालय मंजूर झाले आहे. शहरातील जुना दवाखाना येथील जागा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्हयाला १00 बेडचे नवीन जिल्हा रूग्णालय मंजूर झालेले आहे. या रूग्णालयासाठी ३५ कोटी रूपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहीती देवून सदरच्यानवीन रूग्णालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच जागेअभावी मंजूर रूग्णालयाचे काम सुरू करता येत नसल्याचे स्पष्टकरून या रूग्णालयासाठी एक एकर जागेची आवश्यकता असल्याचेही सांगीतले आहे.

संपुर्ण सातारा जिल्हयासाठी मध्यवर्ती ठिकाण असणा-या सातारा शहरात या नवीन रूग्णालयाची उभारणी जुना दवाखाना येथील संपुर्ण जागेची मालकी ही शासनाची असूनसध्या या ठिकाणी जिल्हा हिवताप कार्यालय, वैद्यकीय मोबाईल युनीट, पाणी प्रयोगशाळा व इएसआय आदीशासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी नवीन मंजूर रूग्णालयाची उभारणी झाल्यास सातारा शहराबरोबरच जिल्हाभरातील रूग्णांना वैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ घेता येईल .तरी सातारा जिल्हयासाठी नवीन मंजूर झालेल्या १00 बेडच्या रूग्णालयासाठी जुना दवाखाना, ४०५,गुरुवार पेठ, सातारा येथील सुमारे ४ एकर जागेपैकी १ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबतचीयोग्य ती कार्यवाही व आदेश आपणाकडून व्हावेत, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!