कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राजकारणापायी शेतकर्यांची अडवणूक केली जात असून, ऊसावरुन जिरवा जिरवी केली जात आहे, आम्हालाही जिरवा जिरवी करता येते. आम्ही लवकरच साखर कारखाना उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
किन्हई, ता. कोरेगाव येथे कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे , शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्र. बर्गे, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, डॉ. गजाननराव चिवटे, अशोक चिवटे, हणमंतराव जगदाळे, विजयराव घोरपडे, प्रा. अनिल बोधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भुसे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कृषी विभागामार्फत नवनवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. शेतकर्यांनी कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी सरकारने ठोस पावले उचलली असून, कृषी विभागाने आता ३० टक्के योजना महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे आता घरातील माता-भगिनीचे नाव सातबारा उतार्यावर घाला आणि थेट कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या, त्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही, एका कागदावर सर्व प्रक्रिया होईल.
You must be logged in to post a comment.