जिल्हा बँकेच्या नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा बँक अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने सत्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील व उपाध्यक्षपदी अनिल शिवाजीराव देसाई निवड झालेने बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने सत्कार करणेत आला.

यावेळी श्री. नितीन जाधव (पाटील) म्हणाले, सातारा जिल्हा बँक देशामध्ये नावाजलेली व सहकारी बँकिंग क्षेत्राला आदर्शवत काम करीत आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. मला या बँकेच्या आदर्शवत कामकाजाचा अनुभव महाराष्ट्रातील सहकार वाढीसाठी चालना देणारा ठरेल. माझ्यावर जी जबाबदार सोपविलेली आहे ती उत्तम प्रकारे पार पाडली जाईल व त्यांचे विश्वासास तडा जाणार नाही अशा प्रकारे बँकेचे कामकाज केले जाईल अशी ग्वाही दिली.

बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा .श्री .अनिल शिवाजीराव देसाई यांनीही जिल्हयातील सर्व जेष्ठ नेत्यांनी विचार करुन मला या पदावर संधी दिली आहे याचा मला विशेष आनंद होत असून बँकेत कामकाज करीत असताना आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, भविष्यांत असेच मौलिक सहकार्य रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली व बँकेचे काम उत्तमप्रकारे केले जाईल अशी ग्वाही देवून उपाध्यक्षपदी फेरनिवड केलेबद्दल सर्वांना मनपुर्वक धन्यवाद दिले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशपातळीवर अग्रस्थानी असून, या बँकेचे विकासाभिमुख वाटचालीमध्ये अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. चे सहकार क्षेत्र तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रास चालना मिळणार असून सर्वसामान्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. बँकेचा संचालक म्हणून कामकाज करीत असताना बँकेचे काम जवळून पाहिलेले असून याचा अध्यक्ष म्हणून कामकाज करीत असताना निश्चितच उपयोग होणार आहे.

बँकेच्या कामकाजाविषयी अत्यंत आत्मीयता व तळमळ आहे. ते सर्वसामान्यांचे हितासाठी सदैव आग्रही राहतात. सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे उन्नतीसाठी व बँकेच्या हितासाठी चांगले कामकाज करणेसाठी प्रयत्नशील राहिले आहेत असे सांगून त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, तसेच अधिक्षक, अधिकारी व सेवकवर्ग यांनीही या प्रसंगी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

error: Content is protected !!