सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :खा .श्रीनिवास पाटील यांचे आता वय झालं आता साताराचे खासदार नितीन काका पाटील तुम्ही व्हावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केली
जावळी तालुक्यातील बेलोशे येथे दत्तात्रेय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मान्यवर उपस्थित होते.
मानकुमरे म्हणाले, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे वय झाले आहे. त्यामुळे आता नितीन काका यांनी खासदार व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचे वजन आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.
You must be logged in to post a comment.