सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ते पाचवड फाटा ता. कराड दरम्यान इनोव्हा व स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. रविवारी 31 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
राहुल प्रल्हाद दोरगे (वय 28) स्वप्नील चंद्रकांत शिंदे (वय 21) रा. कात्रज (पुणे) व रवी भाऊ साळुंखे असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर तुषार गावडे (वय 23) रा. कात्रज, आदित्य ओमासे (वय 16), चंद्रकांत कावरे (वय 76), पूजा ओमासे (वय 40), भरत ओमासे (वय 45), सेजल ओमासे (वय 18) सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातातील एका कारमध्ये पुण्यातील पैलवान असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग पोलिस, वाहतुक पोलिस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, उदय यादव, मधुकर साळुंखे तसेच कर्मचाऱ्यांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत केली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेने जाताना कराडनजीक आटके टप्पा ते पाचवड फाटा दरम्यान इनोव्हा कार व स्विफ्ट डिझायर कारची धडक झाली. कारचालक एकमेकांना ओव्हरटेक करताना प्रणव वाईन शॉपसमोर हा अपघात झाला. अपघातात ही धडक एवढी भीषण होती की, त्यामध्ये तीन जण ठार झाले आहेत. तर अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी जखमींना येथील कृष्णा हॉस्पिटलम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील एका कारमध्ये पुण्यातील पैलवान असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. जखमींना कृष्णा रुग्णालय व सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.