सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः नवीन वर्षाचे स्वागत करण्याबरोबर ख्रिसमससह शनिवार ,रविवार असे सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर,पाचगणीसह कास बामणोलीकडे पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून महामार्गावरील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचे स्वागतासाठी व ख्रिसमसच्या सुट्ट्या आल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारकडून रात्रीची संचारबंदी लागू करीत त्यांची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जोरदार सुरु केली आहे. दरम्यान , महानगरपालिका क्षेत्रामध्ये संचारबंदी लागू केल्याने पर्यटकांनी विशेषत: मुंबई ,पुणे त्याचबरोबर बाहेरील राज्यामधील गुजरात,राजस्थान ,मध्यप्रदेश येथील पर्यटकांनी नगरपालिका क्षेत्रातील पर्यटन क्षेत्राला पसंदी दे दिली आहे. त्यामुळे आशियाई महामार्ग ४७ तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाणामध्ये वाढ झाली असून महामार्ग पोलीसांसहित स्थानिक पोलीस महार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याकरिता उतरले आहे. दरम्यान , वाहतूक सुरळीत होण्यास व वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त वाहने लावल्याने तसेच घाटमार्गावर वाहने बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने व टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली असून संथगतीने महामार्गावरील वाहतूक सुरु आहे.
वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नागरपालिका क्षेत्रामध्ये रात्रीची संचारबंदी लावू होण्याची शक्यता असून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून याबाबतच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
You must be logged in to post a comment.