निलेश मोरे यांची शिवसेना (शिंदेगट) सातारा शहराध्यक्षपदी निवड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक निलेश मोरे यांची शिंदे प्रणित शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे . या निवडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे तसेच जिल्हा संपर्क समन्वयक शरद कणसे यांनी अभिनंदन केले आहे.

साताऱ्यात मोबाईल व्यवसाय क्षेत्रांमध्ये भक्कमपणे पाय रोवणाऱ्या निलेश मोरे यांची राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम पणे सुरु आहे शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी निलेश मोरे यांनी शिंदे यांच्या पाठिंब्याने सातारा शहर आणि परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लावले मग तो शाहू स्टेडियम मधील सिंथेटिक ट्रॅक चा प्रश्न असो किंवा सातारा शहरातील जलतरण तलावाच्या सक्षमीकरणाच्या प्रस्तावाचा या दोन्ही उपक्रमांना निलेश मोरे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला.

साताऱ्यात कोणतीही सत्ता नसताना केवळ जनसंपर्क आणि सकारात्मक काम करण्याची धडपड यामुळे निलेश मोरे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये चांगले कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. शिंदे गटाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे या बांधणीसाठी फार मोठी जबाबदारी निलेश मोरे यांच्या खांद्यावर आली, असून संघटनात्मक कार्य त्यांना बळ मिळावे म्हणून सातारा शहराचे संघटन बांधणी आणि कार्यक्षेत्र मोरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली संघटनेची बांधणी करताना पक्षाची ध्येय धोरणे आणि विकास कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी आमचा अग्रक्रम राहील, अशी प्रतिक्रिया निलेश मोरे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!