नववीतील मुलीची गळफास घेवून आत्महत्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील धुमाळ आळी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थीनीने आज दुपारी राहत्‍या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ती इयत्ता नववीत शिकत होती. आत्महत्तेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनुष्‍का संदीप पवार (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. 

धुमाळ आळी परिसरात अनुष्‍का संदीप पवार (वय १५) ही कुटुंबियांसमवेत राहण्‍यास होती. ती शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकण्‍यास होती. आज दुपारी घरात एकटी असताना तीने राहत्‍या गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. तीने आत्‍महत्‍या केल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. आत्‍महत्तेचे कारण समजू शकले नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्‍यातील हवालदार महेश कदम तपास करत आहेत

error: Content is protected !!