सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :प्रतापगड अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला ना.नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून, पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या सातारा जिल्हयाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे.
कोल्हापूर-कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता तसेच सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी २००९ कोटी रूपये आणि खंबाटकी दुसऱ्या बोगद्याच्या उर्वरित कामासाठी ४९३ कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, सुमारे ३००० कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे.
कामाची निकड आणि मागणी विचारात घेवून, नागरीकांच्या हितासाठी सुमारे ३००० कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबददल ना.गडकरी यांचे आभार मानले.
You must be logged in to post a comment.