महाविकास आघाडीतला कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नव्हता : ना. शंभूराज देसाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :

सातारा : गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. एका हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

आज सातारा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या जिल्ह्याअंतर्गत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, निलेश मोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुखपदी श्री. सावळाराम लाड (शिवंदेश्वर), पाटण तालुका प्रमुखपदी श्री. अॅड. राजेंद्र कदम (मल्हारपेठ), तसेच श्री. राजेश चव्हाण (वाझोली) यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हाप्रमुख श्री. पुरुषोत्तम जाधव, श्री. जयवंतराव शेलार (माऊली) तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जनहितासाठी अखंड प्रयत्नरत आहे. सातारा जिल्हा शिवसेना पदेसाई म्हणाले, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्यावेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसात तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले जाणार, असे पक्षप्रमुखांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी याला विरोध केला होता. कारण हे दोन्ही शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील हे आम्ही सांगितले होते. शिवभोजन केंद्र सुरु करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षात एकही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही. राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली की मंजूर असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरु होता. या अडीच वर्षात कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नाही.
आज मातोश्रीवर ओपन प्रवेश आहेत गेल्या अडीच वर्षात वेगळेच चित्र होते. मुख्यमंत्री दालनात कोविड होता अन् शेजारी असणाऱ्या उपमुख्यमंत्री दालनात कोविड नव्हता, असे चित्र दिसले. शिवसेनेची ताकद वाढवण्याची काम करायचे आहे. असं ते म्हणाले.

error: Content is protected !!