सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): लोणंद नगरपंचायतीची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असून तसा नारा देत त्यांनी सर्वच्या सर्व १७ जागांवर ताकदीचे व सुशिक्षित तसेच जनमानसात चांगले स्थान आसणारे उमेदवार द्यावेत.तशी तयारी करावी. काहीही झाले तरी भाजपला रोखायचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
लोणंद नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर येथील राधेशाम पॅलेस मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खंडाळा कारखाण्याच्या बाबतीत विश्वासघात झाल्याने निवडणूकीत विश्वासघात व सभासदांची दिशाभूल करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावा लागला होता. तो निर्णय कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पाळल्याने जे अपेक्षीत होते ते घडले मात्र तो निर्णय त्या निवडणूकीपुरताच होता.आता मात्र कोणाशी स्थानिक आघाडी होणार नाही. स्व. अॅड. बाळासाहेब बागवान यांनी लोणंद नगरीचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्यांनी ही निवडणूक हातात घेवून काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
You must be logged in to post a comment.