शिवशाही बसच्या चाकाखाली वृद्ध महिला ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध महिला जागीच ठार झाली. हि घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.

गौडाबाई काळे (वय- 75) असे संबंधित महिलेचे नाव आहे. सकाळी बसस्थानकात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी (ता. 3) सकाळी सात वाजता मुंबईला जाणाऱ्या फलाटवरती शिवसाही बस क्रमांक (MH-06-BW- 0642) या गाडी सोबत हा अपघात झाला. यामध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी पोहचले त्यानंतर त्यांनी पंचनामा केला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

.

error: Content is protected !!