सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्याच्या आकोशी येथील गंगुबाई पांडुरंग भणगे (वय ८०) यांचा शेतात होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गंगुबाई भणगे या रविवारी दुपारी घवली फाटा नावाच्या शिवारात गेल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी शेताच्या बांधावर वाढलेले गवत पेटवून दिले. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारणे केले. यावेळी अचानक गंगुबाई भणगे यांच्या साडीच्या पदराने पेट घेतला.
गंगुबाई यांनी ‘मला वाचवा मला वाचवा’ असा आरडा-ओरडा करताच परिसरातील सर्जेराव नामदेव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुष्पा बाळु भणगे यांना बोलावून गंगुबाई याच्या साडीला लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत ५० ते ६० टक्के भाजून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
You must be logged in to post a comment.