सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आफ्रिका खंडातील युगांडाहून फलटण शहरात परतलेल्या पती, पत्नी व दोन मुलांपैकी तीन जणांचे ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनने प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर माहिती मिळताच येथील शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
सदर कुटुंबीय शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. परंतु आता त्यातील तिघांचे ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटणकरांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले असून जर या संसर्गाला पायबंद घालायचा असेल, तर सर्वांनी कोरोना संसर्ग फैलावू नये यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कसोशीने पालन करावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
You must be logged in to post a comment.