सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कडेगाव (ता वाई )येथील जनाई देवीच्या यात्रेत पारंपरिक मिरवणुकीत गाड्याचे दगडी चाक छाती वरुन गेल्य्याने एक जण ठार झाला आहे.शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
कडेगव येथील ग्रामदैवत जानाई देवीची पारंपारिक यात्रेदरम्यान बैलांनी ओढून गाड्याची मिरवणूक निघते .यावेळी गाड्यावर मानकरी बसलेले असतात. शनिवारी गाड्याच्य़ा मिरवणुकीच्या वेळी गाडा वेशीवर जाऊन परत गावाकडे येत असताना गाडा शेतामध्ये अडकल्य़ाने बैलांनी कडून ओढून बाहेर काढत असताना सागर माधवराव मुरूमकर (वय३०) हे गाड्या वरून खाली कोसळले. त्यांच्या छातीवरून गाड्याचे चाक गेल्य़ामुळे ते गंभीर जखमी झाले.त्य्ांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी नेले असता मृत्यू झाल्य़ाचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संग्राम मुरुमकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
You must be logged in to post a comment.