पुसेगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुसेगाव येथे मुख्य राज्यमार्गावर पल्सर दुचाकीला ट्रकने पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पूजा विशाल मोरे ( वय १९ ) यांचा मृत्यू झाला. तर पती विशाल मोरे जखमी झाल्याची फिर्याद लखन मोरे यांनी पोलीस ठाण्यात दिली.    

पुसेगावमधून जाणाऱ्या राज्यमार्गावर सेवागिरी द्रोण पत्रावळी दुकानासमोर बुधवारी दुपारी २ वाजता दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला.विशाल मोरे आणि पूजा मोरे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी  सातारा) हे पल्सर दुचाकीवरुन  साताऱ्याकडे निघाले होते. पाठिमागून येणाऱ्या ट्रकने  (एम एच ११ एफ ४७४३ ) मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. सदर अपघातात पूजा मोरे यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला तर विशाल मोरे हे जखमी झाले. लखन मोरे यांनी ट्रकचालक आयुष भालदर ( करंजेनाका , सातारा ) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. घटनेचा  अधिक तपास पो. ना. व्हि. एम. भोसले करत आहेत.

error: Content is protected !!