शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दुबार गुणपत्रिका ऑनलाईन मिळणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा)  : शिवाजी ‘ विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आता दुबार गुणपत्रिका ही ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे मिळणार आहे. या प्रणालीचे लोकार्पण बुधवारी कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यापुढील काळात विद्यार्थीभिमुख अन्य सेवांचेही टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, संगणक केंद्राच्या प्रभारी संचालक स्वाती खराडे, आदी उपस्थित होते.

दुबार गुणपत्रिकेचे ऑनलाईन सुविधा विद्यापीठाचे अॅप, बेवसाईटवर उपलब्ध असणार आहे. या सेवेमुळे विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा खर्च, वेळ वाचणार आहे. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागेवर गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी दिली

दरम्यान, विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिका घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी लागत असे. यात विद्यार्थ्याचा वेळ, पैसा खर्च होत असे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने ऑनलाईन संगणक प्रणाली स्वनिर्मित केली आहे. अर्जदारास ऑनलाईन अर्ज सादर करणे, पेमेंट गेटवेदवारे भुल्क भरणे या बाबी ऑनाईन स्वरूपात करता येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार विद्यार्थ्यास दुबार गुणपत्रिकेची सॉफ्ट कॉपी नोंदणीकृत ई-मेलवर तातडीने पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणेत्याची मूळ दुबार गुणपत्रिका अर्जदाराकडून विहीत शुल्क आकारून त्याने नोंदविलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा हस्ते दिली जाईल.

error: Content is protected !!