सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाविकास आघाडी सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. करोनाच्या धक्क्यातून आता सरकार हळूहळू सावरत आहे. पण मला मात्र सगळीकडे गेल्यावर पत्रकार मंडळी केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांबद्दलचे प्रश्न विचारतात. यावर प्रश्नांवर मी म्हणेन की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय राज्यात अनेक विषय आहेत. आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे”, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हणाले.
पुणे बंगळुरू महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन आज जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने व मान्यवर उपस्थित होते
जयंत पाटील म्हणाले, “गेल्या वर्षी करोनाचा तडाखा बसला. राज्य सरकारचे एक वर्ष करोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि घटक पक्ष विकासाला गती देण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे.त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे. परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणा संदर्भात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविषयी जे पुरावे मिळतील त्यामुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण कारवाई कशा स्वरूपाची असेल? हे केवळ त्या विभागाचे मंत्रीच सांगू शकतील, असे त्यांनी नमूद केले.
You must be logged in to post a comment.