सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :अवयवदान केल्याने कोणाला तरी नवजीवन मिळू शकते हाच विचार घेऊन फलटण येथे नुकत्याच पार पडलेल्या विवाहात राहुल भोईटे आणि प्रणिता या नवदांपत्याने अवयवदानाचा संकल्प करून एक समाजात नवीन आदर्श उभा केला आहे. अवयवदान संकल्पाचे फॉर्म त्यांनी कोमल न्यू लाईफ फौंडेशन कडे जमा केले.
कोमल न्यू लाईफ फौंडेशन ही संस्था अवयवदान जनजागृती आणि प्रत्यारोपण संदर्भात मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. संस्थेमार्फत अवयवदान माहिती तसेच प्रत्यारोपण संदर्भात समुपदेशन आणि आर्थिक मदत व मार्गदर्शन करत आहे. राज्यातील जनतेचे अवयवदानाबाबत प्रबोधन करुन जास्तीत जास्त दात्यांना संपर्क करुन समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आज कोमल न्यू लाईफ फौंडेशन जगभर करत आहे.
कोमल पवार गोडसे यांचे भारतातील पहिले यशस्वी हृदय आणि फुफुस प्रत्यारोपण 2017 साली झाले.आपल्याला मिळालेले आयुष्य अवयवदानामुळे आहे हे जाणून कोमल पवार गोडसे यांनी आपले आयुष्य अवयवदान चळवळीसाठी वाहून घेतले.आज अखेर 3000 पेक्ष्या जास्त रुग्णांना प्रत्यारोपण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.फलस्वरूप हजारो रुग्णांना नवीन जीवनदान देण्यात यश आले आहे.
कोमल न्यू लाईफ फौंडेशन तर्फे आजपर्यंत 200 हुन अधिक अवयवदान जनजागृती कार्यक्रम करण्यात आले आणि अवयवदानाचे महत्व समाजात पोचवण्यात आले आहे.1 सप्टेंबर 2021 रोजी कोमल पवार गोडसे यांच्या निधनानंतर कोमल यांचे पती धीरज गोडसे ही अवयवदानाची चळवळ पुढे चालवत आहेत आणि कोमल यांची स्वप्नपूर्ती साठी प्रयत्नशील आहेत. या मोहिमेद्वारे राज्यभरातून जास्तीत जास्त अवयवदानाच्या नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबत समाजाच्या विविध स्तरामध्ये अवयवदानाचे महत्व रुजविण्याचे काम केले जात आहे.
अवयवदान चळवळीला तळागाळापर्यंत नेण्याचं काम हि युवा पिढी अतिशय उत्कृष्ट्य पणे करू शकते असे मत कोमल न्यू लाईफ फौंडेशन चे संस्थापक धीरज गोडसे यांनी व्यक्त केले .
You must be logged in to post a comment.