सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील गुरुवार पेठ व मल्हार पेठेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी या परिसरात असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून पत्रकार अमित वाघमारे यांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.शहरी भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.सध्या शहरी भागात प्रशासन ऑनलाइन पध्दतीने लसीकरण प्रक्रीया राबवत आहेत.परंतू शहरातील गोर-गरीब नागरिक व वयोवृद्ध नागरिकांना ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यात अडचणी उद्भवत आहेत. येथील गुरुवार-मल्हारपेठेत बहुतांश लोक हे आरोग्य विभागात बिगारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य अजुनही लसीपासुन वंचित आहेत.या लोकांचा व वयोवृद्ध नागरिकांचा विचार करुन या भागात लसीकरण होणे गरजेचे आहे.
दरम्यान, आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून पत्रकार अमित वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांना समक्ष भेटून निवेदन देऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्काळ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी आपण केलेल्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे अमित वाघमारे यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.