सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावर आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरानजीक कोल्हापूरच्या दिशेने चाललेल्या ऑक्सिजन टॅंकरला गळती लागल्याची खळबळजनक घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने ऑक्सिजन टॅंकर चालला होता. सातारा शहराच्या नजीक आल्यानंतर अचानक आवाज आल्याने चालकाने टॅंकर बाजूला घेतला. तेव्हा टॅंकरमधून ऑक्सिजनची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली. प्रशासनाच्यावतीने शर्तीचे प्रयत्न करून ही गळती थांबविण्यात आली. त्यामुळे कोणतिही दुर्घटना घडली नाही.
You must be logged in to post a comment.