पाडेगावच्या भोंदू बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवऋषी यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विठ्ठल किसन गायकवाड रा. पाडेगाव, ता.खंडाळा असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, विठ्ठल गायकवाड महाराज हा गेली 2 ते अडीच वर्षे स्वतः च्या अंगात दत्त संचारला आहे असे सांगून दर मंगळवार शुक्रवारी व अमावास्या पौर्णिमा या दिवशी मोठ्या प्रमाणात दरबार भरवून येणाऱ्या भक्तांच्या कोणत्याही अडचणींवर उदा करणी काढणे भूतबाधा काढणे, मूल न होणे कोणतीही शारीरिक समस्या  100 टक्के दैवी उपाय सांगणारा हा भोंदू आपले बस्तान वाढवीत होता.

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना माहिती मिळताच त्यांनी त्याचे सहकारी डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ थेट दरबारात भक्त बनून जाऊन समस्यांचा पाढाच वाचला. त्यांना मोठी करणी झाली आहे. नागिणीचा त्रास आहे 8 महिन्यात 100 टक्के मूल होईल असे सांगितले व 11 फेऱ्या करायला लावल्या. यावरून अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की तो भक्तांची आर्थिक मानसिक फसवणूक करत आहे. ही सर्व बाब अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना कळवली . त्यानंतर आज लोणंद पोलिसांनी छापा टाकला असता शनिवारी अमावस्या असल्याने दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त आलेले होते. यावेळी भोंदू अंगात देवाचा संचार आणल्याचे भासवत होता. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून अटक केली.

error: Content is protected !!