पद्मश्री पोपटराव पवार यांची सातारा जिल्हा बँकेस सदिच्छा भेट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीचा कायापालट करून महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभर हिवरे बाजाराचा नावलौकिक करणारे पद्मश्री पोपटराव बागूजी पवार यांनी नुकतेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन पाटील, संचालक श्री. दत्तात्रय ढमाळ, श्री. प्रदीप विधाते, श्री. राजेश पाटील, सौ. कांचन साळुंखे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे यांनी श्री. पोपटराव पवार यांचा शाल, पेढे व बुके देवून सत्कार केला.

कृषि व ग्रामीण अर्थ व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी व सहकार समृध्दी करण्यासाठी सातारा जिल्हा बँक कायमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. बँकेचे आदर्शवत कामकाज हे इतर सहकारी बँकांना मार्गदर्शक ठरत असलेचे गौरवोद्गार यावेळी श्री. पोपटराव पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले.

error: Content is protected !!