सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): स्वराज्याची राजधानी साताऱ्याची स्थापना छत्रपती शाहूमहाराजांनी केली. या संस्थापकांचा राज्याभिषेक दिन अवघ्या महाराष्ट्रात सातारा स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. यंदापासून छत्रपती शाहू राज्याभिषेकाच्या प्रत्येक दिनी म्हणजेच दिनांक १२ जानेवारीला सातारा पालिकेची विशेष सभा किल्ले साताऱ्याच्या शिवराज्याभिषेक दिन अजिंक्यताराच्या राजसदरेवर घेण्याची घोषणा उत्सव समितीच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
दरम्यान, कोणत्याही किल्ल्यांवर विशेष सभा घेण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान राजधानी साताऱ्याला मिळाला आहे. या घोषणेच्या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, इतिहास अभ्यासक डाॅ संदीप महिंद, उत्सव समितीचे अध्यक्ष दीपकप्रभावळकर, संस्थापक सुदाम गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजीसभापती सुनील काटकर, कन्हैयालाल राजपुरोहित, डॉ. चंद्रशेखर घोरपडे,मनोज पाटील, अमोळ सणस, विक्रमसिंह पाटील, प्रशांत पवार, आदी उपस्थित होते. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर अजिंक्यतारा किल्ला शहराच्या हद्दीत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या घोषणेला विशेष महत्व आले आहे.
You must be logged in to post a comment.