निर्मल स्कूलच्या फी वाढीच्या विरोधात पालक आक्रमक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रासह देशमभरात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. कोरोना संकटामुळे शाळा मार्च 2020 पासून बंद आहेत. शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरु आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळांच्या फीच्या प्रश्नांवरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संघर्ष होत असल्याचं चित्र आहे. साताऱ्यातील निर्मल काॅन्व्हेंट स्कूलच्या फी वाढीच्या मुद्यावरुन पालक आक्रमक झाले आहेत.

निर्मल काॅन्व्हेंट स्कूलला पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळा व्यवस्थापन आपली मनमानी करत फी वसूल करत आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक शाळांनी शाळा बंद असताना सुद्धा फी वसूल केली. ज्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेतून काढण्यात आलं आहे, असा मनमानी कारभार या शाळा करत आहे.

अनेक पालक आर्थिक अडचणीत असल्याने शाळा प्रशासनाने ५० टक्के फीमध्ये सवलत द्यावी. आॅनलाईन शिक्षणाची फक्त फी घेण्यात यावी. इतर फीमध्ये सवलत द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!