सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विजय तेंडुलकर हे नाटककार म्हणून मोठे होतेच मात्र कथा,कादंबरीकार म्हणून ते आपल्या लेखनावर फारसे समाधानी नव्हते. त्यातल्या त्यात त्याची नाटककारा नंतर ओळख होती ती कोवळी उन्हे या ललित लेखनामुळे.मात्र त्याला काही मर्यादा होत्या . मधुसूदन उवाच या मधुसूदन पतकी यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी या मर्यादा ओलांडल्या आहेत. कोवळी उन्हेंपेक्षा हे लिखाण अधिक सरस आहे,दोन पावले पुढे आहे असे उदगार ज्येष्ठ लेखक ,विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
कौशिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या मधुसूदन उवाच या मधुसूदन पतकी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.व्यासपीठावर कौशिकचे अरुण गोडबोले , लेखक प्रा.रमणलाल शहा , आकाशवाणी सातारचे अधिकारी सचिन प्रभुणे ,मधुसूदन पतकी,प्रा. प्रकाश बोकील उपस्थित होते. दाभोलकर पुढे म्हणाले, मी तेंडुलकर यांचा अनेक वर्षे स्नेही होतो. आणि पतकी यांचे लिखाण नक्कीच आपल्या पुढे एक पाऊल पुढे गेले आहे हे त्यांनी मान्य केले असते. याचे कारण तेंडुलकरांनी व्यक्ती ,प्रसंग याची एक चौकट घालून घेतली होती. पतकी यांनी ती चौकट ओलांडून ललित लेखन खूप पुढे नेले आहे. ललित चिंतन फारसा प्रचलित नसलेला पण हवाहवासा वाटणाऱ्या लेखन प्रकाराला लखूप ताजेपणानी वाचकांसमोर ठेवले आहे. मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करताना अशा लेखन प्रकाराला वाचकांपर्यंत पोचवणे हि आपली जबाबदारी आहे. सकस लेखन आणि दर्जेदार पुस्तक ,उत्तम मुखपृष्ट यांनी हे पुस्तक आणि लेखक संग्राह्य झाला आहे.
अरुण गोडबोले यांनी पुस्तक प्रकाशना मागची भूमिका स्पस्ट करताना लेखनाचा नवा बाज मधुसूदन पतकी यांनी समर्थपणे पल्ल्याचे सांगून इथेच न थांबता अजून लिहीत रहावे आम्ही प्रकाशित करू असे सांगितले. प्रभुणे यांनी , आकाशवाणीवर या लेखनाचे वाचन करत असताना आनंद झाला. असे सांगून हे चिन्तन आपल्या प्रतिकाच्या आयुश्यातले असल्याने आपलेसे वाटते आणि सहज मनात घर करते असे स्पस्ट केले. प्रा.शहा यांनी पुस्तकातले काही उतारे वाचून लेखन शैली बद्दल विशेष काउतूक केले. मधुसूदन पतकी यांनी, लेखन करताना आकाशवाणी आणि मुद्रित साहित्य करताना माध्यमांतर करताना अनेक बदल लेखनात केले.भाषा प्रवाही ,वाक्ये अत्यन्त छोटी मात्र आशयघन करत दैनंदिन जीवनातले प्रसंग निवडले .त्यामुळे हे लेखन आपल्या जगण्याशी थेट जोडलेगेले.अनेक महान व्यक्तींच्या विचारांवर लिहिण्यापेक्षा त्यांच्या विचारांत इतरांना सहभागी करून घेऊ हा विचार करून लिहिल्याने त्यात उपदेश आणि सूचना याचा लवलेश नाही.केवळ सहज मारलेल्या गप्पा आहेत असे सांगितले
यावेळी ज्येष्ठ लेखक ,कथा,पटकथा ,संवाद लेखक प्रताप गंगावणे , भालचंद्र कुलकर्णी,प्रा. डॉ.प्रशांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.प्रकाश बोकील यांनी सुत्र संचालन केले .यावेळी मानसी मोघे , भुजबळ सर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.शाम बडवे,डॉ.राजेंद्र माने, डॉ.अनिमिष चव्हाण,डॉ.सुहास पोळ,डॉ.धनंजय देवी,रवींद्र झुटींग आदी मान्यवर उपस्थित होते.