सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसनवीर कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये, कारखान नीट चालू नये, ही भावना ठेऊन वाईचे आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांचे निवडक सहकारी सातत्याने काम करत आहेत,” असा आरोप किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केला आहे.
किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी मदन भोसले यांच्यावर आरोप केले होते. त्यांना आज मदन भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे.
भोसले म्हणाले, चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आम्हाला ‘किसन वीर’साठी आर्थिक सहाय्य केले. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर प्रशासक मंडळाला हे करायला भाग पाडलं. आम्हाला पैसे देऊ दिले नाही हे सगळे उघड सांगताना आता अवघड होत आहे. कारण हे सगळं करायला भाग पाडण्यामध्ये या दोन पाटील बंधूंचा पुढाकार आहे, ही वस्तुस्थिती आहे.
You must be logged in to post a comment.