सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण सांगत असताना पत्रकार निघून गेले, असे वक्तव्य केले होते. यावर सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला.
“साताऱ्यातील त्या सभेला शरद पवार मंचावर येण्यापूर्वी साताऱ्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे सभा रद्द करण्याच्या विचार सुरु होता. राज्याच्या राजकारणाचं चित्र पालटवणारी साताऱ्यातील ती सभेत पत्रकार निघून गेले होते. केवळ राष्ट्रवादीचा एक कॅमेरा त्या ठिकाणी होता. ही घटना शशिकांत शिंदे यांनी घडवून आणल्याचं आज सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, दीपक प्रभावळकर, विनोद कुलकर्णी, शरद काटकर, दिपक दिक्षीत, दिपक शिंदे व पत्रकरांनी निषेध नोंदवला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याबद्दल पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.