साताऱ्यात एसपी समीर शेख यांचे गुन्हेगारी रोखण्यासाठी पेट्रोलिंग

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्वतः गस्त घालण्याचा निर्णय घेतला. समीर शेख हे स्वतः रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगसाठी उतरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अल्पवयीन गुन्हेगारी देखील वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीत खून, खूनाचे प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी ही सातारा जिल्ह्यात मोठ्या चिंतेचा विषय बनत चालला होता. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या सर्व पार्श्वभूमीवर साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कडक भूमिका घेतली आहेत.

गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांनी आता स्वतःच कंबर कसली आहे. गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे. साता-यात वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी रात्रीच्या वेळी पोलिस अधिका-यांना सोबत घेऊन स्वतःच गस्त घालणे सुरू केले आहे. त्यांच्या या धोरणाचे साता-यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

error: Content is protected !!