सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाका परिसरात पुण्या-मुंबईच्या धर्तीवर पादचारी पुल बांधावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल बडेकर यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरातील पोवई नाका परिसरात आठ रस्ते असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. तसेच वाहतुकीमुळे चालणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होऊ शकते. पोवई नाक्यापासून हाकेच्या अंतरावरच जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालये आहेत त्यामुळे ग्रामीण भागांतून येणाऱ्या नागरिकांचीही रेलचेल असते.फुटपाथवर अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालण्यास फुटपाथ असून नसल्याचे चित्र आहे.त्याचबरोबर शहरातील शाळा, कॉलेज, भाजी मंडई आदी ठिकाणीही वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अशा ठिकाणी पुण्या-मुंबईच्या धर्तीवर पादचारी पुल बांधून सातारानगरीच्या नागरिकांच्या या जीवघेण्या कसरतीतुन कायमस्वरूपी मुक्तता व्हावी.
You must be logged in to post a comment.