सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः ब्रिटनमध्ये करोनाचा नवा घातक विषाणू सापडल्यामुळे जगभर खळबड उडाली असून ब्रिटनवरून गेल्या महिनाभरात आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्याचे आदेश राज्यसरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यानुसार गेल्या महिन्याभरात सातारा जिल्ह्यात १५ प्रवाशी दाखल झाल्याने प्रशासनाने या ब्रिटन रिटर्न प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.
ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये करोनाचा नव्या विषाणू सापडला आहे.या आधीच्या करोनापेक्षा हा करोना ७० टक्के अधिक वेगाने फैलाव होत असल्यामुळे हा करोनाचा विषाणू अधिक घातक समजला जात आहे. रोखण्यासाठी ब्रिटनसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे.तर दुसरीकडे दक्षता म्हणून केंद्रसरकारने ब्रिटनसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे.परंतु,सदरचा करोना विषाणू हा ब्रिटनमध्ये गेल्या महिन्याभरापासून आढळून येत आहे.त्यामुळे केंद्रसरकार तसेच राज्यसरकार खळबळून जागे झाले असून गेल्या महिनाभरापासून राज्यात दाखल झालेल्या प्रवाशांचा शोध नव्याने सुरू केला आहे.
राज्यशासनाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला २५ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात परत आलेल्यांची यादी प्रशासनाला पाठवली आहे. १५ प्रवाशी महिनाभरात परतले आहेत.या सर्वांचा शोध घेवून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाला प्राप्त झाल आहेत.त्यानुसार या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून टेस्ट निगेटिव्ह आली तर, त्यांना १४ दिवस पुन्हा क्वारंटाईनची सक्ती करण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.