सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी रिपाइंच्यावतीने परवानगी देणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्याची मागणी रिपाइं मातंग आघाडीच्यावतीने केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक, नागरी उड्डाण विभागाकडून परवानगी देण्यात यावी, यासाठी रिपाइंच्या मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांनी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला आहे. या मागणीच्या निवेदनावर रिपाइं मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे ,पश्चिम महाराष्ट्र संघटक रघुनाथ बाबर,सातारा शहराध्यक्ष मधुकर (बंडू) घाडगे , जिल्हा सहसचिव सागर फाळके आदींच्या सह्या आहेत.
You must be logged in to post a comment.