फलटण ते पुणे (लोणंद मार्गे) डेमू ट्रेनला हिरवा झेंडा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, गिरीश बापट, श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, नगराध्यक्षा नीता नेवासे, फलटण या प्रसंगी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाल्या.

जावडेकर म्हणाले, रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे आणि पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे. यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टीवीटी मिळेल.

error: Content is protected !!