सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गाणी गाण्यापेक्षा आता तुम्ही सातारकरांना नेमकं सांगा, काय बाय सांगू कसं गं सांगू तुम्हाला नक्की कशाची लाज वाटली तेही सांगा, असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची खिल्ली उडवली.
गोडोली जकात नाका ते अजंठा हॉटेल परिसरातील रहिवाशांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने नवीन पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी चक्क शिवेंद्रराजे यांनी जेसीबी चालवला.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, दहा मिनिट रडायचं आणि पप्या घ्यायचं, आता त्यापेक्षा तुम्ही विकासकामे सांगा. निवडणुका जवळ येतील तसं ते पाया पडतील, गळ्यात पडतील परंतु हे सर्व तात्पुरतं आहे. गळ्यात पडण्याचं प्रेम हे मनापासून नाही, तर निवडणुकीपुरतेच आहे. लोकांनीही विकासकामं होतात की नाही ते पहावं. सातारा शहरातील हद्दवाढीचं काम आम्ही केलंय. केवळ निवडणुकीपुरतंच तुमच्यासमोर आलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
You must be logged in to post a comment.