पोलीस खाते ऍक्शन मोडवर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला गुरूवारपासून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विना मास्क आणि दुकानांमध्ये गर्दी दिसल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आजपासून पोलिसांकडून कडक करवाई करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. प्रचंड गर्दीत होणारी लग्ने आणि हॉटेल्समधील गर्दी रोखण्यासाठी मंगल कार्यालये, हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉनमध्ये कोविड विषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास 25 हजार दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी जारी केले. जिल्हय़ात कोरोना संसर्ग वाढत असून माण तालुक्यात वाढीचा वेग जास्त आहे. माण तालुक्यातील दहिवडीपाठोपाठ खटाव तालुक्यातील पुसेगाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातच बुधवारी रात्री आलेल्या अहवालात 111 पॉझिटिव्ह आले असून 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात एका मृत्यूची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!