सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा पोलीस परेड ग्राउंड येथे कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर या विभागा तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड वर वरिष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम व खेळाडूंसाठी बॉक्सिंग ग्राउंड चे उद्घाटन करण्यात आले. तसेच पोलीस कवायत जिमची पाहणी करून जिम अद्ययावत करण्यासाठी सुचना केल्या.
या कार्यक्रमाला सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील , गृहविभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, क्रीडा प्रबोधनी व्यवस्थापक किशोर धुमाळ, ग्राऊंड इंचार्ज शिवाजी जाधव, शशिकांत गोळे, रॅपीडिशन फोसे व सर्व क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.