डॉक्टरांच्या छम छम पार्टीवर पोलिसांचा छापा ; आठ जणांना अटक

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कासवंड (ता महाबळेश्वर) येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सातारा सांगली व पुण्यातील आठ डॉक्टर व हॉटेल चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिलारपासून (ता.महाबळेश्वर) जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावर स्प्रिंग रिसोर्ट या हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्तिकांसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने साताऱ्यात खळबळ उडाली. पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे व अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,कासवंड ता. महाबळेश्वर या गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टर लोकांसमोर युवती तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करीत नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यातील विशेष पथक व पाचगणी पोलीस कासवंड येथे रवाना करण्यात आले. रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच व मिरज येथील एक व पुण्यातील औषध विक्रेता असे सात जण दारूच्या नशेत नर्तिकांवर नोटा उडवत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले.

पाचगणी व सातारा पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट हॉटेल चालक असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे डॉ. मनोज विलास सावंत (रा.दहिवडी), डॉ. राहुल बबनराव वाघमोडे (रा.दहिवडी), डॉ. निलेश नारायण सन्मुख (रा.मिरज), डॉ. रणजीत तात्यासो काळे (रा.दहिवडी) डॉ. महेश बाजीराव साळुंखे (मलकापूर,कराड) डॉ. हनुमंत मधुकर खाडे (दहिवडी, सातारा) डॉ. प्रवीण शांताराम सौद (पुणे फार्मासिस्ट), विशाल सुरेश शिर्के (हॉटेल चालक) (रा.पसरणी ता.वाई) चार नर्तिकांना चौकशी करून सोडून देण्यात आले. अधिक तपास पांचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

error: Content is protected !!