दिवसभरात आठ पॉझिटिव्ह, 27 जण कोरोनामुक्त


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 27 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 8 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 726 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 499 झाली आहे. तर 196 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 

कोरोनाबाधितांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :  सातारा : कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष आणि 17 व 14 वर्षीय युवती, फलटण : लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला, वाई : शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष, कराड : तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : बेल एयर हॉस्पिटलमधील (मूळचा चेंबूर, मुंबई) येथील 51 वर्षीय पुरुष, असे एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत
 
आणखी 27 जण कोरोनामुक्त
कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे दाखल असणारे 8, सह्याद्री हॉस्पिटल (कराड) येथील 3, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव)येथील 2, बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 11, खावली कोरोना केअर सेंटर येथील 3 अशा एकूण 27 जणांना दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
कोरोनामुक्तांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे

कराड : बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, खराडे (हेळगाव) येथील 55 वर्षीय व 45 वर्षीय महिला, खराडे येथील 15 युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवक, शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक,  पाटण : दिवशी येथील 27 वर्षीय पुरुष, जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालक, काळेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सळवे येथील 45 वर्षीय महिला, वाई : जांभळी येथील 12 वर्षीय युवती, वाई येथील 41 वर्षीय पुरुष व 36 वर्षीय महिला, आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, दह्याट येथील 8 महिन्यांची बालिका व 27 वर्षीय महिला, परतवाडी येथील 51 वर्षीय पुरुष,  खंडाळा : अहिरे येथील 24 वर्षीय महिला, जावली : अंबेघर येथील 59 वर्षीय पुरुष, काटावली येथील 29 वर्षीय पुरुष, वहागाव येथील 34 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 55 वर्षीय महिला, सातारा : वावदरे येथील 56 वर्षीय पुरुष, धनावडेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगाव: ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 23 व 57 वर्षीय कटापूर येथील महिला, अशा 27 कोरोनामुक्तांना घरी सोडण्यात आले.
 
169 जणांचे नमुने तपासणीला रवाना;
तीन जणांच्या मृत्यू पश्चात नमुन्यांचा समावेश

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 23, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 27, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 17, फलटण येथील 3, कोरेगाव येथील 14, वाई येथील 14, शिरवळ येथील 7, रायगाव येथील 6, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 14, दहिवडी येथील 19 अशा एकूण 169 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) आणि क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व एनसीसीएस (पुणे) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातील फलटण येथील 70 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील बावधन येथील 53 वर्षीय महिला व जावली तालुक्यातील गांजे येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात नमुना अनुमानित म्हणून तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
 
138 जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह
रात्री उशिरा एनसीसीएस (पुणे) यांनी 138 जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर कळविली आहे.
 
error: Content is protected !!