Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
बाधित 800 तर कोरोनामुक्त 600 च्या पार !
आरोग्य
सातारा जिल्हा
बाधित 800 तर कोरोनामुक्त 600 च्या पार !
20th June 2020
प्रतिनिधी
जिल्ह्यात दिवसभरात 13 पॉझिटिव्ह, 13 कोरोनामुक्त; 167 जणांचे नमुने निगेटिव्ह
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 13 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 13 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 804 झाली आहे तर कोरोनामुक्तांची एकूण संख्या 606 झाली आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) व एनसीसीएस (पुणे) येथे तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
पाटण : शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण, कराड : चिखली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष तुळसण येथील अनुक्रमे 50, 54, 79 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला व एक वर्षाचे बालक, जावली : शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, सातारा : सावली येथील 22 वर्षीय पुरुष, असे एकूण 13 कोरोनाबाधित आढळले आहेत.
आणखी 13 जण कोरोनामुक्त
विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणार्या 13 जणांना शुक्रवारी 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
सातारा : देगाव येथील 60 वर्षीय पुरुष, कुसवडे येथील 58 वर्षीय पुरुष, कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय तरुण कुसवडे (आसनगाव) येथील 47 व 19 वर्षीय महिला, वाई : 30 वर्षीय महिला, सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला, वेरुळी येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा व 26 वर्षीय महिला, फलटण : बरड येथील 55 वर्षीय महिला, जावली : भणंग येथील 40 वर्षीय महिला, जावली येथील 55 वर्षीय महिला अशा 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
213 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 30, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 41, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 18, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 19, ग्रामीण रुग्णालय (वाई) येथील 6, शिरवळ येथील 19, रायगाव येथील 6, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 5, दहिवडी येथील 37 अशा एकूण 213 जणांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
167 जणांचे नमुने निगेटिव्ह
एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 167 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
सातार्यात पुन्हा एकदा ‘रोल… कॅमेरा… अॅक्शन !’
‘सातारा आरटीओ’चे कामकाज सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.