सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : गोंदवले बु. ता.माण येथे नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.
कोविड केअर सेंटरचे उदघाटन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते, राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे या कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.सोनाली पोळ, माण पंचायत समितीचे सभापती तानाजीराव कट्टे, तेजस शिंदे, मनोज पोळ, युवराज सुर्यवंशी, सुभाष नरळे, संदीप मांडवे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब माने, सुनील पोळ, बाळासाहेब काळे, कविता म्हेत्रे, रमेश पाटणे, जयप्रकाश कट्टे,संजय माने, अंगराज कट्टे, पृथ्वीराज राजमाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी सुर्यवंशी, डी.वाय.एस.पी.देशमुख, तहसीलदार सौ.बाई माने व इतर अधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.