सदाभाऊ खोत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे

रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.

सोनू साबळे म्हणाले, रयत क्रांती संघटनेने दूध दरवाढी साठी आंदोलन, दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध गोष्टी व आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले तर ऊसाच्या एफआरपी साठी आंदोलन असेल एसटी कामगारांचे आंदोलने व सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसून आंदोलने करून भाजपला बळ देण्याचे काम आतापर्यंत भाऊंनी केलेली आहे. याची पोचपावती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपबरोबर खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे राजकारण-समाजकारण करीत आहेत. यामुळे खोत यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारवाढीत मंत्रिपद मिळावे अशी रयत क्रांती पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

रयत क्रांती पक्षाचे व रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत २०१४ साली कोणतीही अपेक्षा न करता भाजप व मित्र पक्षाबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. सध्या भाजप व मित्र पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार आहे. असे असले तरी सदाभाऊ खोत हे गेल्या पाच वर्षांपासून लोकांभिमुख सर्व पदापासून वंचित आहेत. यामुळे कार्यकर्त्यांत मरगळ पसरली आहे. कार्यकर्त्यांत सर्वत्र निराशेची भावना आहे.

सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार जास्तीत मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. यासाठी त्यांनी दोन-तीन महिने स्वतःची सर्व कामे बाजूला ठेऊन महायुतीच्या उमेदवारांचे काम केले आहे .यामुळे खोत यांचे योगदान नजरेआड करण्यासारखे नाही. तरी सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.

error: Content is protected !!