प्रतापगड कारखान्याचा किसनवीर कारखान्याबरोबर करार मोडण्यासाठी साखर आयुक्तांकडे लवाद दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसनवीर सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला प्रतापगड सहकारी साखर कारखाना कारखाना क्षमतेने चालवला होता. मात्र सद्यस्थितीत किसनवीर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असून प्रतापगड कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाही. याबाबत प्रतापगड संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार किसनवीर कारखान्याशी  करार संपुष्टात आणून प्रतापगड पुन्हा स्वबळावर चालवण्यासाठी ताब्यात द्यावा. याकरिता साखर आयुक्त यांच्याकडे लवादाची नोटीस दाखल केली. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे, बाळासाहेब निकम ,मालोजीराव शिंदे, प्रकाश भोसले व प्रदीप तरडे उपस्थित होते.

याबाबत माहिती अशी आहे की, सन २०१२ -१३मध्ये प्रतापगड सहकारी साखर व  किसनवीर सहकारी साखर कारखान्याबरोबर  भागीदारी करार केला होता . किसनवीर कारखान्याकडून सुरुवातीच्या काळामध्ये प्रतापगड कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालवण्याचा प्रयत्नही केला.

सद्या किसनवीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने मागील पाच वर्षात तीन गळीत हंगाम हा प्रतापगड कारखाना बंद ठेवन्यात आला.तसेच कारखान्याच्या कामगारांना 15 महिन्यापासून पगार मिळालेला नाही आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. मागील गळीत हंगामातील शेतकऱ्यांची 12 महिने बिले दिले नाहीत. तसेच  कराराची  कोणतीही पूर्तता झाली नाही . यामुळे  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कारखान्याची प्रॉपर्टी अटॅच करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते.यामुळे किसनवीर कारखान्याकडून प्रतापगड कारखान्याशी असणारा करार मोडवा . प्रतापगड व्यवस्थापन आणि  शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे चालवला जाईल.असा विश्वास संचालक मंडळांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.तसेच किसनवीर कारखाना व्यवस्थापनानाने सामंजस्याने प्रतापगडचा करार संपुष्टात आणावा असे आवाहनही प्रतावगड संचालक मंडळाने  केले आहे.

error: Content is protected !!