महाबळेश्वर, (भूमिशिल्प वृत्तसेवा ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाच्या स्मृती जागविणारा ”किल्ले प्रतापगड ३६२ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला.
शनिवार चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री ८.०० च्या दरम्यान कोणताही गाजावाजा न करता शासनाने दिलेल्या सुचनेनुसार फक्त मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव करण्यात आला. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशालींमुळे गडावरील हा ”नयनरम्य” ”नजराणा” डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. मंदिराच्या चहुबाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर भवानी माता मंदिर ते बुरुज पर्यंत लावण्यात आलेल्या माशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा जागर गोंधळ ,ढोल ताशा, आतिषबाजी व महाप्रसाद या सारखे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडावरील या मशाल महोत्सवाचे आयोजन येथील चंद्रकांत उतेकर,विजय हवलदार, संतोष जाधव, विलास मोरे, ओमकर देशपांडे स्वराज्य ढोल पथक,माय भवानी सामाजिक संस्था प्रतापगड,वाडा कुंभरोशी ग्रामस्थ करीत असतात.
You must be logged in to post a comment.