प्रतापगड कारखान्यात सौरभ शिंदे विरुध्द दीपक पवार लढत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार विरुध्द पंचायत समिती उपसभापती सौरभ शिंदे या दोन गटात ही लढत होत आहे.

प्रतापगड कारखाना बिनविरोध करावा, यासाठी आवाहन कारखान्याचे प्रमुख साैरभ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व नेतेमंडळींना केले होते. त्यानुसार कारखाना गट, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतही बिनविरोध साठी बैठक झाली. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही तरी राजकीय घडामोडी व तडजोडी होतील व निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा तालुक्यातील सभासदांना होती. ती आजअखेर संपुष्टात आली. प्रतापगड कारखान्याच्या २१ जागांसाठी आजअखेरच्या दिवशी ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक लागली आहे.

error: Content is protected !!