ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी खेळात निवड झालेल्या प्रवीण जाधव याच्या सरडे, ता. फलटण येथील मूळगावी कुटुंबियांना गावातीलच लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत सांघिक आणि वैयक्तीक प्रकारात सहभाग घेणाऱ्या साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी दिली जात आहे. जाधवच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून ही धमकी दिली जात आहे.

आता ऑलिम्पिकमधून परत आल्यानंतर प्रवीणने मिळवलेल्या यश पाहवत नसलेल्या शेजारी त्याला धमकी देणारे फोन करत आहेत. जाधव कुटुंबातील चार जण एका झोपडी वजा घरात राहतात. जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले. यासंदर्भात जाधवने सांगितले की, सकाळी पाच सहा जण आले आणि माझ्या वडीलांना आणि काकांना धमकी देऊन गेले. आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे.

याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत. त्याला विरोध करत आहे. या घरात आम्ही अनेक वर्षापासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले.

भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू ऑलिम्पिकमधून थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेलेत. तेथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत. बुधवारीपासून ते नव्याने सुरुवात करतील. जाधव म्हणाला, माझे कुटुंबीयांना त्रास होत आहे आणि मी तेथे त्याच्या सोबत नाही. यासंदर्भात मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे, ते या गोष्टीत लक्ष घातलील.

error: Content is protected !!