दोन्ही राजे पालिका निवडणुकीत आमने सामने असतीलच, असे नाही : प्रवीण दरेकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्याचे दोन्ही राजे आमचेच आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत ते आमने सामने असतीलच, असे नाही, असे मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले,सातारा शहराची हद्दवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, अजून एक दमडीचाही निधी दिलेला नाही. साताऱ्याचे दोन्ही राजे आमचेच आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत ते आमने सामने असतीलच, असे नाही. त्याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील.

error: Content is protected !!