सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जपानमधील टोकियो येथे दि. २३ जुलै पासून सुरु होणार्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’ (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सरडे ता. फलटण गावचा सुपुत्र प्रविण रमेश जाधव याची निवड झाली आहे.
प्रविण जाधव हा मुळचा सरडे, ता. फलटणचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. या शाळेतील त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्याकडील कौशल्य ओळखून त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर प्रविण अमरावती येथे ‘आर्चरी’ (धर्नुविद्या) चे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला.नेमबाजीतील कौशल्यावर त्याची २०१५ साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. यातूनच पुढे सन २०१६ च्या आर्चरी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रविणला संधी मिळाली आणि आता टोकियो येथे होत असलेल्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी ‘पदका’चा अचूक वेध घेण्यासाठी प्रविण सज्ज झाला आहे.
‘
You must be logged in to post a comment.