ज्येष्ठ नागरिक,दिव्यांगांसाठी कोरेगावात पूर्व तपासणी शिबिर

कोरेगाव,((भूमिशिल्प वृत्तसेवा): दिव्यांग बंधू-भगिनी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी कोरेगावात पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की; नवी दिल्ली येथील सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या योजनेतून हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधने यांचे मोफत वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्राथमिक भाग म्हणून पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर होत आहे. हे दोन दिवसांचे शिबिर असून २७ फेब्रुवारी रोजी दिव्यांगाकरिता आणि २८ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांकरिता हे शिबिर असणार आहे. कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात हे शिबिर होणार आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार व अलिम्को या संस्थेच्या तज्ज्ञांमार्फत सल्ला देण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना; पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या गरजेनुसार दुसऱ्या टप्प्यात तीन चाकी सायकल, व्हीलचेअर,काळ्या कँलिबर्स, कुबड्या, मोटर सायकल ,कृत्रिम हात पाय, श्रवणयंत्रे, ब्रोल किटस, एम आर टिप्स, नंबरचा चष्मा ,स्मार्टफोन इत्यादी उपकरणे मोफत दिली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याने आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात नाव नोंदणी करावी ,असे आवाहन करण्यात आले आहे .ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो ,उत्पन्नाचा दाखला तसेच दिव्यांगांनी सिव्हिल सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा दाखला, आधार कार्ड ,रेशन कार्ड ,दोन पासपोर्ट साईज फोटो आणि उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे .१ लाख ८० हजार इतकी उत्पन्नाची मर्यादा आहे .दिव्यांगांना कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधने मोफत मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने मोफत मिळाववीत, हा या शिबिरामध्ये उद्देश असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!